वनरक्षक भरती 2023 संपूर्ण माहिती | Forest Guard Exam All Details Apply Last Date
वनरक्षक पदासाठी शैक्षणिक पात्रता | Educational Qualification Required for Forest Guard Exam
- उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (12 वी) विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
- अनुसुचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (10 वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.
- माजी सैनिक हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (10 वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.
- नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचाऱ्याचे पाल्य हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (10 वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.
वनरक्षक पदासाठी वेतनश्रेणी | Pay Scale for Forest Guard
6 वा वेतन आयोग रु. 5200 ते रु. 20200, ग्रेड पे रु. 1800
वनरक्षक पदासाठी वयोमर्यादा | Age Limit for Forest Guard Exam
- उमेदवार हा 18 वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा व 25 वर्षांपेक्षा जास्त वयाचा नसावा.
वनरक्षक पदासाठी शारीरिक पात्रता | Physical Requirement for Forest Guard Exam
- उमेदवाराने खालीलप्रमाणे उंची, छाती व वजन निकष पूर्ण केलेले असावे.
वनरक्षक भरती लेखी परीक्षा अभ्यासक्रम | Forest Guard Syllabus
पात्र उमेदवारांची 120 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येते. लेखी परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, मराठी व इंग्रजी या चार विषयांवर प्रश्न विचारले जातात.
लेखी परीक्षा ही माध्यमिक शालांत (10 वी) पातळीची राहते.
लेखी परीक्षा ही 90 मिनिटांची असते. लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतात. प्रत्येक प्रश्नास 1 गुण व प्रत्येक चुकीच्या उत्तरास 0.5 गुण कमी करण्यात येतील.




कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें